Story of Teacher and Student in Marathi : शिक्षक आणि विद्यार्थ्याची गोष्ट
सर्वच कीटकांची प्रेझेंटेशन्स एकापेक्षा एक छान होत होती. मधमाशीचा डिनर डान्स, चतुरकिड्याचं जिम्नॅस्टिक, मुंग्यातील बॉडीगार्डस अन् मुंगी बॉम्ब ! सगळं काही अद्भुतच होतं. इतर वेळी शाळेबाहेर एकमेकांना पाण्यात बघणाऱ्या कीटकांचा एकमेकांविषयीचा आदर वाढला होता. टेंगूळकिड्याला तर मुंग्या जे काही सांगतायत ते ऐकताना अगोदर काटा आला होता. मुंग्याचं कर्तृत्व ऐकताना त्याला युद्धाच्या चित्रपटातील शूर सैनिक दिसत होते. मरते दमतक लढणारे ! मुंग्याचं प्रेझेंटेशन झाल्यानंतर त्याला वाटत होते की आपणही मुंगी असतो तर किती बरे झाले असते. आपण लढाईतलं सर्वोच्च पदक मिळविलं असतं! आज पुन्हा सर्व कीटक शाळेत पोहोचले होते. आज हेडमास्टर सरांच्या डोक्यात काही वेगळेच होतं. त्यांनी शाळेच्या हॉलमध्ये मधोमध एक मोठा टेबल ठेवला होता. त्या टेबलावर कागदाच्या चिठ्ठ्यांचा ढिग दिसत होता. मुंगीच्या प्रेझेंटेशनवर सर खूपच खूश होते.
त्यांनी काही मुंग्यांना समोर बोलवलं आणि सांगितलं “तुम्हांला हवी ती चिठ्ठी उचला. त्यात ज्याचं नाव असेल त्या कीटकानं आज प्रेझेंटेशन करायचं. सात आठ मुंग्यांनी एकेक चिट्ठी उचलली. गुरुजी लगेच म्हणाले, “या चिठ्ठ्या माझ्याकडे दया. मुंग्याकडून घेतलेल्या सात आठ चिठ्या गुरुजींनी आपल्या ओंजळीत ठेवल्या. त्यांनी चतुर कीटकाला हाक दिली अन् सांगितले. “या चिठ्ठीतली कोणतीही एक चिठ्ठी उचल”. सांगायचा अवकाश चतुराने भुर्रकन त्यातली एक चिट्ठी उचललीसुद्धा अन् ती हेडमास्टर गुरुजींना लगेच आणून दिलीसुद्धा.
also read : Story of Four Boys in Marathi
त्या चिठ्ठीत नाव होतं ‘मास्टर आर्किटेक्ट वाळवी !’ घराचं डिझाईन काढून ती बांधणाऱ्याला आर्किटेक्ट असं म्हणतात. या चिठ्ठीत वाळवीला ‘मास्टर आर्किटेक्ट’ म्हणजे सर्वात बेस्ट आर्किटेक्ट असं म्हटलं होतं. वाळवीलाही खूप आनंद झाला. त्याही आपल्या वारूळ म्हणजे घर बांधण्याचा कौशल्याचाच परिचय करून देणार होत्या. मुंगी अन् मधमाशीप्रमाणं वाळवीही कधी एकटी राहत नाही. त्यामुळे सर्वांसमोर परिचय करून देण्यासाठी एक वाळवी पुढे आली अन् इतर जणी एकेक करून तिच्यामागून आल्या. पटणार नाही पण मित्रांनो या सर्व वाळव्यांनी इंजिनिअर काम करताना जसे हेल्मेट घालतो त्याप्रमाणे हेल्मेट घातले होती. या सर्व हेल्मेट घातलेल्या वाळव्या परिचय करून देणाऱ्या वाळवीच्या मागे ओळ करून उभ्या राहिल्या. त्यांचा तो अवतार बघितल्याक्षणीच सर्व कीटकांनी टाळ्यांचा कडकडाट सुरू केला.
Leave a Comment