Story of Four Boys in Marathi

Story of Four Boys in Marathi : चार मुलांची गोष्ट

1 min read

Story of Four Boys in Marathi: चार मुलांची गोष्ट

परीक्षा संपली. निकाल लागला. वर्षातील सर्वात मोठी सुट्टी सुरू झाली. उन्हाळ्याची सुट्टी म्हणजे मौज, मजा, मस्ती याबरोबरच सुट्टी म्हणजे काहीतरी नबीत् शिकण्याची संधीही. उन्हाळ्याच्या सुट्टीला आपल्या आयुष्यात एक वेगळंच स्थान आहे. या सुट्ट्यांच्या आठवणींवर आपलं भावनिक आयुष्य समृद्ध होत जातं. आयुष्याला समृद्ध करणारे अनेक जादुई क्षण आपल्याला या सुट्टीतच गवसतात. या सुट्ट्यांचा पुरेपूर आणि सकारात्मक उपयोग केला गेला तर आपण खूप काही नवीन मिळवू शकतो.

also read : Story on Change of Arts in Marathi

तुम्हां किशोरवयीन मुलामुलींमध्ये प्रचंड ऊर्जा असते. या ऊर्जेचा अधिकाधिक वापर करता यायला हवा. या सुट्टीत नवीन वाटा शोधण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करा. या आहेत शब्दांच्या, रंगांच्या, स्वरांच्या वाटा. गंधांच्या, निसर्गाच्या आणि कलांच्या वाटा. ‘कला’ ही अशी गोष्ट आहे जी मनुष्यप्राण्याला इतर प्राणिजगतापासून वेगळं करते. पुस्तकी ज्ञान, परीक्षा यापुढेही एक मोठं जग आहे. जे अमर्याद आहे. ते तुमच्या आतील मनस्वी कलावंताला सतत खुणावत असतं.

त्या सादेला प्रतिसाद द्या. या सुट्टीत एखादया नवीन कलेशी नातं जोडा.

कदाचित याच जादुई क्षणांत तुम्हांला तुमचे भविष्य सापडेल.

Share This News

ताज्या बातम्या

Leave a Comment

आमच्या विषयी

Hello Beed मध्ये आपले स्वागत आहे. बीड शहरातील ताज्या बातम्यांचे हे आपले विश्वसनीय ठिकाण आहे. आम्हाला तुमच्यापर्यंत अचूक आणि वेळेवर बातम्या पोहोचवायच्या आहेत. आजच्या वेगवान जगात अद्ययावत राहणे खूप महत्त्वाचे आहे. म्हणूनच आम्ही तुम्हाला बीडमधील बातम्या, सरकारी योजना आणि इतर महत्त्वाच्या घटनांची माहिती देतो.