Story on Change of Arts in Marathi

Story on Change of Arts in Marathi: “कलेतील बदलावरील” कथा

1 min read

Story on Change of Arts in Marathi: “कलेतील बदलावरील” कथा

नृत्यकलेला फार प्राचीन परंपरा आहे. नृत्यात संगीत हा अविभाज्य भाग आहे. आपल्यापैकी प्रत्येकाने कधी ना कधी नृत्य हे केले असणारच. आपला भारत देश जसा विविध भाषा, धर्म, पंथ व संस्कृर्तीनी समृद्ध आहे. तसाच तो विविध नृत्य प्रकारांनीही समृद्ध आहे. भारतात लोकनृत्य हा नृत्यप्रकार लोकप्रिय आहे. भारतातील विविध प्रदेशांप्रमाणे लोकनृत्याचे विविध प्रकार पहायला मिळतात.

आज आपल्याकडे चित्रपटगृहे, टिव्ही, मोबाईल, रेडिओ अशी मनोरंजनाची विविध माध्यमे आहेत. पण पूर्वीच्या काळी लोकांकडे ही माध्यमे नसल्यामुळे लोक सण, समारंभ, उत्सवात, किंवा एखाद्या आनंदाच्या प्रसंगी गाणी म्हणून, नृत्य करून आनंद व्यक्त करत असत. तसेच राजदरबारी राजाच्या मनोरंजनासाठी नृत्य निपुण राजनर्तिका असायच्या.

भरतमुनींनी तर नृत्य व संगीतावर आधारीत नाट्यशास्त्र ग्रंथाची निर्मिती केलेली आहे. शास्त्रीय नृत्याचा तो प्रमाणग्रंथ आहे. शास्त्रीय नृत्याचे एकूण आठ प्रकार आहेत. कथक, कुचिपुडी, कथकली, मोहिनीअट्टम, ओडिसा, सतरिय, मणिपुरी, भरतनाट्यम. आपल्या इतिहासाचे आणि समृद्ध अशा संस्कृतीचे चित्रं नृत्यप्रकारांमधून दिसून येते. काहीही न बोलता सुद्धा नर्तकाच्या चेहऱ्यावरील हावभावांमधून आपल्याला नर्तकाला काय सांगायचे आहे हे कळते इतकी ही कला भावप्रधान आहे.

also read : Story on Summers Vacation in Marathi

नृत्यामुळे संपूर्ण शरीराला व्यायाम मिळतो. नृत्याच्या कलात्मक हालचालींमुळे शरीर कमनीय होते. आपलं शरीर हाच आपला खरा दागिना ! त्यामुळे पौष्टीक आहार आणि नियमित व्यायाम हा हवाच! नृत्यामुळे मनाला आनंद तर मिळतोच मात्र आपला व्यायामही होतो. नृत्यासाठी लागणाऱ्या चपळ हालचाली, लवचिकपणा या सगळ्या गोष्टींमुळे आपले शरीरही लवचीक व तंदुरुस्त राहते. नेहमीच कंटाळवाणी वाटणारा व्यायामही आपल्याला छान वाटायला त्येकाने लागतो, कारण तो इतका नकळत होऊन जातो की आपल्याला कळतच नाही. नृत्यामधील अनेक छोट्या छोट्या गोष्टींमुळे आपली पंचेद्रियेसुद्धा अधिक समृद्ध व आहे. होतात. मन उत्साही राहते. नृत्याला सरावाची आहे. आवश्यकता असल्याने आपल्यामध्ये नियमितता येते. विविध नृत्यासाठी आवश्यक असणाऱ्या काटेकोरपणामुळे आपल्यात सतर्कता येते. नृत्याच्या वेळी करण्यात येणाऱ्या साजशृंगारामुळे प्रसन्नता येते. त्यामुळे नकारात्मकता नाहीशी होऊन सकारात्मकता येते व सकारात्मकतेमुळे जीवन आनंददायी होते.

अशी ही छान आनंददायी कला या सुट्टीत तुम्ही शिकलात तर खरंच तुमची सुट्टी नक्की चांगली जाईल.

Share This News

ताज्या बातम्या

Leave a Comment

आमच्या विषयी

Hello Beed मध्ये आपले स्वागत आहे. बीड शहरातील ताज्या बातम्यांचे हे आपले विश्वसनीय ठिकाण आहे. आम्हाला तुमच्यापर्यंत अचूक आणि वेळेवर बातम्या पोहोचवायच्या आहेत. आजच्या वेगवान जगात अद्ययावत राहणे खूप महत्त्वाचे आहे. म्हणूनच आम्ही तुम्हाला बीडमधील बातम्या, सरकारी योजना आणि इतर महत्त्वाच्या घटनांची माहिती देतो.