Story On Poor Person and Rich Person in Marathi : गरीब आणि श्रीमंत व्यक्तीवर कथा

Story On Poor Person and Rich Person in Marathi : गरीब आणि श्रीमंत व्यक्तीवर कथा

टुण टुण उड्या मारत शर्यतीत पुढे जाऊन झोपणाऱ्या गर्विष्ठ सशाची आणि हळूहळू पण सतत चालून त्याला मागे टाकणाऱ्या कासवाची गोष्ट आपल्याला माहीत आहे. वेलीवर लटकलेली द्राक्षे उड्या मारमारूनही न मिळाल्यामुळे ‘ती आंबटच आहेत !’ अशी स्वतःची समजूत काढणारा कोल्हाही आपल्या ओळखीचा आहे. जंगलाचा राजा सिंहाला शिकाऱ्यानं टाकलेलं जाळं कुरतडून मोकळं करून चिमुकल्या उंदरानं परोपकाराची केलेली परतफेडही आपण ऐकत आलो आहोत. या सगळ्या गोष्टी ‘नीतिकथा’ कुणी सांगितल्या आहेत ?

फार फार वर्षांपूर्वी, म्हणजे इसवीसनापूर्वी ६२० ते ५६४ या वर्षांत ग्रीस देशात एक माणूस राहात होता. त्याचं नाव होतं इसाप. इसाप हा होता एक गुलाम. त्याकाळी काही देशांतले लोक आपल्याकडे काम करण्यासाठी दुसऱ्या देशांतून माणसं पकडून आणत असत. तसं कुणई म्हणतात, इसापला आफ्रिकेतून, इथियोपिया या देशातून गुलाम म्हणून पकडून आणलं आणि ग्रीस देशात एका व्यापाऱ्याला विकलं. झांथस हे इसापच्या मालकाचं नाव. आपल्या मालकाची चाकरी करता करता इसाप अनेक गोष्टी सांगायचा. त्याच्यासारखेच इतरही काही गुलाम आणि दासी झांथसकडे होत्या. ते सगळे कष्टाचं जिणं जगत. त्यांचे कष्टाचे, गुलामगिरीचे दिवस, त्याचं दुःख हलकं करण्यासाठी, रमवण्यासाठी इसाप आपल्या या मित्रमैत्रिणींना, अनेक गोष्टी सांगत असे असंही म्हणतात. अतिशय कुरूप, ढेरपोट्या, लठ्ठ गिढड्रा, ओठ बाहेर आलेल्या बेढब इसापची झांथसकडे येणारे सगळे ग्रीक लोक चेष्टा करत. पण तरीही इसाप त्याच्या या कल्पना शक्तीतून सुचणाऱ्या गोष्टींमुळे सगळीकडे दूरवर प्रसिद्ध झाला.

Also Read : PM Matru Vandana Yojana 2024

इसाप मुख्य करून गोष्टी सांगायचा तो आपल्या अवतीभवतीच्या प्राणी-पक्ष्यांच्या. त्याच्या गोष्टींमधले प्राणी-पक्षी माणसांसाकडे वागतात. ‘करकोचा’ आणि ‘कोल्ह्याची’ गोष्ट आपल्याला माहीत आहे. करकोच्याला घरी जेवायला बोलावून पसरट थाळीत जेवण वाढणाऱ्या, आणि त्यामुळे लांबचोचीच्या करकोच्यावर उपाशी राहाण्याची पाळी आणणाऱ्या धूर्त कोल्ह्याला करकोचा कशी अद्दल घडवतो, ते इसाप सांगतो. ‘लांडगा आला रे आला!’ असं रोज खोटं खोटं ओरडणाऱ्या मेंढपाळ मुलाला जेव्हा खरंच लांडगा येतो, तेव्हा कोणीच कसं मदत करत नाही, तेही इसाप रंगवून सांगतो.

कसं जगावं, याची शिकवण देणाऱ्या इसापच्या कथा ‘इसाप फेबल्स’ या नावानं सगळीकडे ओळखल्या जातात. ही प्रत्येक ‘नीतिकथा’ सर्वात शेवटी आयुष्याला एकेक धडा देते. ‘एकी हेच बळ’ किंवा ‘करावे तसे भरावे’ अशा सारखी तात्पर्ये आपण या नीतिकथांतून काढू शकतो.

या गोष्टी वेगवेगळ्या भाषांत सांगितल्या गेल्या. त्या काळाच्या ओघात जगात ठिकठिकाणी पोचल्या त्या कथांवर चित्रपट निघाले. अगदी ब्राझीलसारख्या देशातही त्या गोष्टींवर नाटकं सादर झाली. इसापच्या कथा टिव्ही सिरीयल्समधून पाहायला मिळाल्या. इंग्लंडमध्ये त्यावर संगीतिका रचल्या गेल्या. तर दक्षिण आफ्रिकेतही नाटकं रचली गेली.

अशारीतीने चेष्टेचा विषय बनलेल्या गुलाम इसापच्या सुंदर गोष्टी लोकांनी आवर्जून वर्षानुवर्षे ऐकल्या. जगात सर्वत्र आठवल्या गेल्या. पिढ्यान् पिढ्या पिठ्या सांगितल्या गेल्या. इसवीसनापूर्वीच्या या गोष्टी आजही आपण एकविसाव्या शतकात आवडीनं ऐकतो, हेच इसापच्या गोष्टीचं, बुद्धिमत्तेचं, कल्पनाशक्तीचं सौंदर्य !

Leave a Comment