Story of Pranav and Pari in Marathi : प्रणव आणि परी गोष्ट.
मधली सुट्टी संपून पुन्हा वर्ग चालू झाले होते. ५ वी अ च्या वर्गावर कदम सर वनस्पतींचे वेगवेगळे प्रकार समजावून देत होते. फळ्यावार झाडांच्या आकृत्या काढून, मुलांना त्यांनी, त्या वहीत काढायला संगितले. प्रणवचे लक्ष मात्र सर दाखवत असलेल्या चार्टकडे आणि फळ्याकडे नव्हते. तो खिडकीतून बाहेर दिसणाऱ्या झाडांकडे बघत होता. त्याला खिडकीच्या समोर असलेल्या कैलासपतीच्या झाडावरील एका फुलाभोवती एक चतुर मिरभिरताना दिसला. त्याने पुन्हा फळ्याकडे लक्ष देण्याचा प्रयत्न केला. इतक्यात त्याला आवाज ऐकू आला, ‘ए, शुक शुक…’ प्रणवने खिडकीबाहेर पाहिले. तिथे एक चिमुकली परी होती. ‘कोण आहेस तू? प्रणवने विचारले.
‘मला ओळखलं नाहीस ? मी परी आहे परी.’ ‘अगदी खरीखुरीं परी ?’ ‘हो. अगदी खरीखुरीं परी’ ‘ इथे कशाला आलीयस?’
‘तुला भेटायला आणि सांगू, तुमचे कदम सर फार छान शिकवतात. मला ते ऐकायला खूप आवडते. म्हणून मी रोज या वेळी इथे येते.’
‘मला तर तू आजच दिसते आहेस. कुठे राहतेस तू ?’
‘मी ना, त्या कै लासपतीच्या झाडातल्या फुलात राहते. या वेळी इथे येते. त्या खिडकीबाहेरच्या कोपऱ्यात गुपचूप बसून तुमचे सर शिकवतात, ते ऐकते. म्हणून तुला दिसत नाही.’ ‘तू अगदी खरीखुरीं परी आहेस, तर तुझ्याकडे जादूची छडी असेल ना. कोणतीही इछा पूर्ण करणारी. कुठेही घेऊन जाणारी ?’
‘हो आहे ना !’
‘मला ती थोड्या वेळासाठी देशील ?’
‘देईन की ! पण एक लक्षात ठेव. त्यामुळे तुझ्या फक्त तीन इच्छा पूर्ण होतील. मग त्या छडीची जादू संपून जाईल.’ परीने एक लहानशी काटकी प्रणवच्या हातात ठेवली आणि ती काही तरी पुटपुटली. प्रणवच्या हातात ती काटकी आल्यावर फूटपट्टीसारखी दिसू लागली.
‘आता काय मागावे बरे या जादूच्या छडीजवळ ?’ प्रणव विचार करू लागला. मग मनाशीच म्हणाला, आत्ता लगेच नको. नीट विचार करून काय ते मागू या. त्याने ठरवले.
दुसऱ्या ओळीतल्या चौथ्या बाकावर बसलेला पब्या, म्हणजे प्रबोध तिसऱ्या बाकावरील सुब्याच्या, म्हणजे सुबोधच्या शर्टावर मागच्या बाजूने ‘आय अॅम ए डाँकी’ असे लिहीत होता. प्रणवची जादूची पट्टी नकळतच पुढे झाली आणि तो पुटपुटला, ‘जादूची काठी काम कर लवकर.
सुब्याच्या पाठीवरची अक्षरे,
पुसून टाक लवकर
पब्याच्या पाठीवर उठू देत ती भराभर’
सुब्याच्या शर्टवर मग अक्षरे उठलीच नाहीत.
‘शीः स्केच पेनमधली शाई संपली वाटते’, असे पुटपुटत पब्याने पेन बॅगेमध्ये ठेवले. प्रणवने पट्टी पुढे केलेली कदम सरांनी पहिली होती. ‘प्रणव, काय चाललेय तुझे?’
‘काही नाही सर !’ प्रणवने पट्टी मागे घेतली. ‘चला सगळ्यांनी फळ्यावरच्या प्रमाणे झाडांची चित्रे काढून त्यांना नावे द्या. प्रणव वहीत झाडांची चित्रे काढू लागला. पण ती चित्रे काढता काढता कसे कुणास ठाऊक, त्याच्या वहीवर त्याने कैलासपतीच्या गडाचे आणि त्यावरील फुलाचे आणि फुलाजवळील रीचेच चित्र काढले.
also read : Story of Unique Friend in Marathi
परीचे चित्र काढून झाल्यावर इकडे तिकडे व्यताना त्याला दिसले, चौथ्या ओळीत तिसऱ्या श्रीकावर बसलेला धवल्या म्हणजे धवल, गौऱ्याच्या नणजे गौरवच्या पाठीमागून शर्टाच्या आत राजकुयल्या टाकतोय. प्रणवने लगेचच आपली जादूची पट्टी डोळ्यापुढे धरून त्याच्या दिशेला धरली आणि तो पुटपुटला,
‘जादूची काठी काम कर लवकर.
खाजकुयल्या पडू देत धवल्याच्या अंगावर आणि त्याला दिसले खाजकुयल्या उडून धवल्याच्याच शर्टमध्ये पुढच्या बाजूने पडल्या आहेत आणि तो खाजव खाजव खाजवतोय. पाठ, मान, कोपर, पोट… धवल्या आपला खाजवतोय आणि सगळी मुले त्याला हसताहेत. प्रणवच्या शेजारी बसलेला मनोज मात्र म्हणत होता, ‘तुझी पट्टी म्हणजे दुर्बीण आहे का, डोळ्यापुढे धरून आणि एक डोळा बारीक करून बघतोयस ते.’
‘नाही रे ! असेच !’ प्रणवने पट्टी खाली घेतली. तिसऱ्या ओळीत तिसऱ्या बाकावर पल्या म्हणजे पालकर आणि सौरभ बसले होते. सौरभचा काल वाढदिवस झाला होता. त्याबद्दल त्याला काल त्याच्या पप्पांनी बॉलपेन घेऊन दिले होते. लाल चुटूक रंगाचे आणि सोनेरी टोपण असलेले हे नवे बॉलपेन त्याला खूप आवडले होते. मधल्या सुट्टीत त्याने ते मुलांना दाखवले. मुलांनाही ते खूप आवडले. पल्याने त्याच्यावर डल्ला मारायचे ठरवले. त्याला मुलांच्या अशा लहान-मोठ्या गोष्टी चोरायची सवयच होती. पण तो अजून तरी ‘रेड हँड’ पकडला गेला नव्हता. मुले त्याच्या अपरोक्ष त्याला डल्ल्याच म्हणायची. समोर म्हणायची मात्र कुणाची हिंमत नव्हती. मारामारी करण्यात पल्या एक नंबर. आज सगळी जण फळ्याकडे लक्ष देत आहेत, असे पाहून पल्याने सौरभच्या बॅगेत पेन घेण्यासाठी हात घातला आणि योगायोगाने प्रणवने ते पाहिले. ‘बरा आज हा ‘रेड हँड’ सापडला’ असे मनाशी म्हणल, त्याने पट्टी त्या दिशेने धरली आणि मंत्र पुटपुटला,
‘जादूची काठी काम कर लवकर.
पल्याचा हात चिकटून राहू दे बॅगेवर.’
पल्याचा हात बेंगेवर चिकटला, तो त्याला काढताच येईना. इतक्यात कदम सरांचे लक्ष तिकडे गेले. ‘ए, काय गडबड चालू आहे तिकडे’, ते म्हणाले.
‘काही नाही सर!’ पल्या म्हणाला. या गडबडीत प्रणवच्या हातातली पट्टी हलली आणि पल्याचा हात सुटला. त्याला पेन मात्र घेता आले नव्हते. ‘शीऽ ! आज चांगला ‘रेड हँड’ पकडता आले असते त्याला ! सुटला !’ प्रणव हळहळला.
सर आता मुलांनी वहीत झाडांच्या आकृत्या काढून त्यांना नावे दिली आहेत की नाही, ते पाहत वर्गात फिरू लागले. फिरत फिरत ते प्रणवपाशी आले. ‘बघू तुझी वही !’ ते म्हणाले. ‘अरे, मी काय काढायला सांगितले होते आणि तू काय काढलेस!’
‘परी सर !’ प्रणव म्हणाला. ‘ती बघा तिथे आहे.’ त्याने खिडकीकडे बोट दाखवले. तिथे एक चतुर गिरक्या घेत होता. प्रणवला मात्र त्याच्या जागी परीच दिसत होती.
‘परी कुठे आलीय? चतुर आहे तो. चतुर कीटक !’ सर म्हणाले.
मुलांनाही चतुरच दिसत होता. सगळे प्रणवकडे पाहून हसत होते. ‘परी बघा परी…’ सगळे प्रणवची चेष्टा करत होते.
प्रणवने खिडकीकडे जादूची पट्टी करत म्हटले, ‘परी गं परी, ये लवकर. सगळ्या सगळ्यांना दिस लवकर.’ पण हे काय ? मुलांना चतुरच दिसत होता. मग त्याला आठवले, त्याच्या नकळत त्याच्या तीनही इच्छा पूर्ण झाल्या आहेत. पट्टीतली जादू संपली आहे. परी आता कैलासपती झाडाच्या फुलाकडे निघाली तिथून तिने प्रणवला बाय केले, ‘उद्या येशील ना?’ त्याने तिला विचारले.
‘हो नक्कीच येईन. मला तुमचे सर शिकवतात, फार आवडते.’ ती म्हणाली.
सरांनी प्रणवची वही बघितली. सर आता रागावणार, म्हणून प्रणव खूप घाबरला. सर थोडेसे रागावले. पण खूप नाही. म्हणाले, ‘चित्र चांगले काढले आहेस, पण ते विज्ञानाच्या तासाला नाही काढायचे. चित्रकलेच्या तासाला किंवा रिकाम्या वेळेत काढायचे. आता आधी झाडांच्या आकृ त्या काढून त्यांना नावे दे.’ प्रणवने मान हलवली. सर जाता जाता असेही म्हणाले, ‘आणि हे बघ. दुपारचा डबा जरा कमी आणत जा. जास्त खाल्ले की गुंगी येते आणि कधी कधी उघड्या डोळ्यांनीसुद्धा स्वप्ने पडतात, परीबिरीची,’
मुले हसत होती. म्हणजे काय, इतका वेळ मुले आपल्यालाच हसत होती की काय? आपल्याला मात्र वाटत होते, मुले पब्याला, धवल्याला आणि पल्याला हसताहेत. ‘बरे सर!’ असे म्हणत तोही आता मुलांच्या हास्यात सामील झाला.
Leave a Comment