Story of Laborer Add in Marathi

Story of Laborer Add in Marathi : मजूर अड्डा गोष्ट.

1 min read

Story of Laborer Add in Marathi : मजूर अड्डा गोष्ट.

प्रत्येक शहरात मजूर अड्डे असतात. सकाळी सकाळी जिथे खूप सारे मजूर एकत्र जमतात त्या जागेला ‘मजूर अड्डा’ असं म्हणतात. कशासाठी जमतात ते? या अड्ड्यांवर हे मजूर आपापली अवजारं घेऊन काहीतरी काम मिळण्याची वाट बघत उभे असतात. घराची साफसफाई, नाल्यांची सफाई, गवंडीकाम अशी अनेक कामं करणारी माणसं त्यात असतात.

इथे उभ्या राहणाऱ्या मजुरांपैकी काहींनाच काम मिळतं. ५० पैकी ४० मजुरांना कामाविना घरी परतावं लागतं. काम मिळालं नाही तर पैसे नाहीत. पैसे मिळाले नाहीत, तर घरात स्वयंपाकासाठी सामान आणता येत नाही. मग ते काय जेवतात ? आणि त्यांची मुलं ?

काही लोक काम मिळवण्यासाठी नाइलाजाने आपला भाव पाडतात, कमी पैशांत काम करायची तयारी दाखवतात. मजुरीसाठी घासाघीस करताना पाहणं फार त्रासदायक असतं. मजूर अड्ड्यावर एखादी स्कूटर किंवा कार थांबली रे थांबली की त्याभोवती एकदम दहा-बारा मजूर घोळका करतात. एका कामासाठी एवढे मजूर ! साहजिकच मजुरीचा दर कमी कमी होत जातो.

also read : Life Story of Hima Das.

खरं तर मजुरी कशी ठरवायला हवी? समजा, मला माझ्या कामासाठी कोणीच मिळालं नाही, तर ते काम मला स्वतःला करावं लागेल. ते करायला तीन दिवस लागले तर त्या तीन दिवसांचा माझा पगार गेला. मग त्या गरीब मजुराला माझ्या तीन दिवसांच्या पगाराएवढेच पैसे मिळायला हवेत का ? तुम्हाला काय वाटतं ?

तुमच्या शहरातही असे मजुरांचे अड्डे असतील. कधी तरी सकाळी तिकडे चक्कर मारा. ते एकमेकांत काय बोलता त ते ऐका. काम देणाऱ्या माणसांशी कसं बोलतात बघा. तुम्हीही त्यांच्याशी काही बोला. त्यांचे ऐका.

Share This News

ताज्या बातम्या

Leave a Comment

आमच्या विषयी

Hello Beed मध्ये आपले स्वागत आहे. बीड शहरातील ताज्या बातम्यांचे हे आपले विश्वसनीय ठिकाण आहे. आम्हाला तुमच्यापर्यंत अचूक आणि वेळेवर बातम्या पोहोचवायच्या आहेत. आजच्या वेगवान जगात अद्ययावत राहणे खूप महत्त्वाचे आहे. म्हणूनच आम्ही तुम्हाला बीडमधील बातम्या, सरकारी योजना आणि इतर महत्त्वाच्या घटनांची माहिती देतो.